Tech Tips: अरेरे... Facebook पोस्ट चुकून डिलीट झाली? नो टेंशन, रिस्टोअर करण्यासाठी आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
बऱ्याचदा असे घडते की एखादी पोस्ट डिलीट करायची असते पण घाईगडबडीत दुसरीच पोस्ट डिलीट होते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची डिलीट झालेली पोस्ट रिस्टोअर करू शकता. चला तर मग फेसबुकवरून चुकून डिलीट झालेली फेसबुक पोस्ट तुम्ही कशी रिस्टोर करू शकता ते जाणून घेऊया.
सर्वप्रथम तुमचे फेसबुक अकाउंट उघडा. आता फेसबुकवरील तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
प्रोफाइल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तीन डॉट दिसतील, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर 'सेटिंग अँड प्रायव्हसी' वर क्लिक करा.
'सेटिंग्ज अँड प्रायव्हसी' पर्यायावर जाऊन, तुम्हाला पुन्हा एकदा सेटिंग्ज पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला अॅक्टिव्हीटी विभागात जावे लागेल.
आता अॅक्टिव्हिटी लॉग वर क्लिक करा. या विभागात, तुम्ही अलीकडेच डिलीट केलेल्या सर्व पोस्ट तुम्हाला दिसतील. आता तुमच्या डिलीट केलेल्या पोस्टवर क्लिक करा आणि तेथे दिसणाऱ्या 'रिस्टोर' पर्यायावर क्लिक करा.
अशा प्रकारे, तुम्ही चुकून डिलीट केलेल्या पोस्ट सहजपणे रिस्टोर करू शकता आणि यासाठी तुम्हाला वेगळे थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही.