सूर्याचा जीवनचक्र संपल्यानंतर पृथ्वी नष्ट होईल किंवा निर्जीव, गोठलेला खडक बनेल. (फोटो सौजन्य - Social Media)
सूर्य हायड्रोजन या इंधनावर चालतो. एक दिवस हे इंधन संपेल आणि सूर्य फुगायला लागेल. त्यावेळी तो “लाल महाकाय तारा” (Red Giant) बनेल.
सूर्याचा आकार खूप मोठा झाल्यावर तो बुध आणि शुक्र ग्रहांना गिळून टाकेल. पृथ्वी त्याच्या कक्षेत राहील की आत खेचली जाईल, याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत, पण ती सुरक्षित राहणार नाही हे निश्चित.
सूर्याचा जीवनचक्र संपल्यानंतर पृथ्वी नष्ट होईल किंवा निर्जीव, गोठलेला खडक बनेल. (फोटो सौजन्य - Social Media)
रेड जायंट टप्पा पार केल्यानंतर सूर्य आपलं बाह्य आवरण फेकून देईल आणि छोटा, घनता जास्त असलेला “व्हाईट ड्वार्फ” बनेल. तो हळूहळू थंडावणारा प्रकाशमान खडक बनेल.
सूर्य व्हाईट ड्वार्फ झाल्यानंतर पृथ्वी जर अस्तित्वात राहिली तर ती एक निर्जीव, अंधारात वावरणारा, थंड खडक बनून जाईल. जीवनाचा कोणताही अंश शिल्लक राहणार नाही.