लोहाने समृद्ध असलेले पदार्थ
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. मेथी, पालक, लाल माठ इत्यादी पालेभाज्या आरोग्यसाठी गुणकारी आहेत.
भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, अंबाडीच्या बिया हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील लोहाची पातळी वाढण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स लोह शोषून घेते.
शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मसूर डाळ, फळे, विटामिन सी युक्त फळे भाज्यांचे सेवन करावे.
शरीरातील लोहाची कमी झालेली पातळी वाढवण्यासाठी आहारात बीटरूटचे सेवन करणे. बीटरूट खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
सुक्या मेव्यात नैसर्गिक गोडवा आणि लोहाचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळून येते. सुक्या मेव्यामध्ये अंजीर, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करावे.