टीम इंडिया : भारताचा संघ T-20 विश्वचषक 2024च्या मोहिमेची सुरुवात आज करणार आहे. भारताचा संघ आज म्हणजेच 5 जूनपासून आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारताच्या संघाला विश्वचषकाच्या आधी न्यूयॉर्कची खेळपट्टी चाचपून पाहण्याची संधी मिळाली. भारताच्या संघाने एकमेव सराव सामना बांग्लादेशविरुद्ध खेळाला आणि सामन्यात विजय मिळवला. आजचा हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारताच्या संघाची सराव करतानाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत याकडे एकदा नजर टाकूया. (फोटो सौजन्य – BCCI इंस्टाग्राम अकाउंट)
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये आज युझवेन्द्र चहलला संधी मिळेल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल. चहलने आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.
भारताच्या प्लेइंग-11 चा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विराट कोहली कुठे खेळणार? यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने संघासाठी ओपनिंग केली होती त्यामुळे त्याला सलामी फलंदाज म्हणून आजच्या सामन्यात मैदानात उतरू शकतो. पण जर कोहली ओपन करत नसेल तर यशस्वी जैस्वाल ओपन करेल आणि त्यानंतर कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.
पार पडलेल्या सराव सामन्यांमध्ये भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर सुद्धा चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
भारताचा विकेटकिपर रिषभ पंत झालेल्या अपघातानंतर दमदार पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर तो त्याचा फॉर्ममध्ये आयपीएल २०२४ मध्ये पुन्हा आला आहे. (फोटो सौजन्य ICC इंस्टाग्राम अकाउंट)
आज भारताचा संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा T-२० विश्वचषक खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या रणनीती काय असेल याकडे चाहत्यांचे लक्ष्य असेल.