किळसवाणी रूम, टॉर्चर, जेवण नाही! भारतीय अरबपतीची लेक युगांडाच्या तुरुंगात, कोण आहे वसुंधरा ओसवाल?
वसुंधरा ओसवाल ही प्रसिद्ध बिसनेसमॅन पंकज आणि राधिका ओसवाल यांची मुलगी आहे. वसुंधरा वडिलांच्या कंपनीत काम करत असून ती कंपनीचा युगांडातील संपूर्ण कारभार पाहते
माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी वसुंधरा युगांडाच्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कहोल प्लांटच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी काही शस्त्रधारी लोकांनी तिला अटक केली. पंकज ओसवाल यांच्या दाव्यानुसार, हे शस्त्रधारी स्वतःचा पोलीस अधिकारी सांगतात मात्र यावेळी त्यांच्याकडे अटकेचं कोणतंही वॉरंट नव्हतं
वसुंधरा यांना भेटण्याची कुटुंबियांना परवानगी नाही. वसुंधराच्या अटकेनंतर तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. युगांडाच्या तुरुंगात वसुंधराला टॉर्चर केले जात असल्याचा आरोप पंकज ओसवाल यांनी केला आहे.
90 तासाहून अधिक काळ वसुंधरा हिला एका कोंदट खोलीत ठेवण्यात आलं. तिथे तिला खाण्या-पिण्यास दिले जात नाही. तसेच बाथरूमची अवस्थाही अतिशय घाण आहे. वसुंधराला खोट्या आरोपाखाली अटक केल्याचा दावा पंकज यांच्याकडून करण्यात आला आहे
ओसवाल यांच्या युगांडातील घरातून एका कर्मचाऱ्याने किमती सामानाची चोरी केली. त्याने ओसवाल कुटुंबाच्या नावावर 2,00,000 डॉलर्सचे कर्जदेखील घेतले होते. हे प्रकार उघडकीस आल्यावर या कर्मचाऱ्याने वसुंधरावर खोटे आरोप लावले असे पंकज ओसवाल यांनी सांगितले.