बाईक चालवताना लागते थंडी मग नक्की वाचा. (फोटो सौजन्य - Social Media)
अनेक जण या वातावरणात राईड केल्यामुळे आजारी पडतात. जर तुम्हाला कामामुळे दररोज बाईकची सफर करावी लागते. जर ही सफर रोज सकाळची असेल तर अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. तर अशा वेळी काही उपाय कामी येतात.
जर तुम्ही एखादा जॅकेट घेतला. जॅकेटची चैन खुली करून छातीच्या इथे काही वर्तमानपत्र ठेवले आणि चैन लावून घेतली तर बर्यापैकी फरक दिसून येतो.
आधी वाटत असलेली थंडी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. फक्त न्यूजपेपरच नव्हे तर एअर पॉलिथिन बॅग्सही आपण या कामासाठी वापरू शकतो.
ज्याप्रमाणे आपण वर्तमानपत्र जॅकेटमध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे आपण या एअर पॉलिथिन बॅग्स ठेऊ शकतो. महत्वाची गोष्ट अशी आहे कि या बॅग्स वर्तमानपत्राच्या तुलनेने फार जाड असतात.
तर हा नुसखा जास्त कामी येतो. अशा प्रकारे तुम्ही न्यूजपेपर आणि एअर पॉलिथिन बॅगचा वापर करून बाईक चालवताना या वाढत्या थंडीचा सामना करू शकता.