Year Ender 2024: 2024 मध्ये फ्लॉप झालं या टिव्ही स्टार्सचं कमॅबक, TRP च्या अग्निपरिक्षेत झाले फेल
नील भट्ट - 'गुम है किसी के प्यार में' या हिट मालिकेनंतर टीव्ही अभिनेता नील भट्ट मेघा बरसेंगेमध्ये दिसत आहे. कलर्स टीव्हीचा हा शो टीआरपी गोळा करण्यात अपयशी ठरला आहे.
अंकित गुप्ता - उडारियाँनंतर आता अंकित गुप्ता 'माटी से बंधी डोर' या मालिकेत दिसत आहे. पण या शोला अपेक्षित टीआरपी मिळत नाही. त्यामुळे ही मालिका देखील फ्लॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे.
निया शर्मा - अभिनेत्री निया शर्माने अनेक वर्षांनंतर सुहागन चुड़ैल या छोट्या पडद्यावरील मालिकेतून पुनरागमन केलं होतं. मात्र या मालिकेने केवळ 3 महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
मल्लिका सिंह - राधा कृष्णमध्ये राधाची भुमिका साकारल्यानंतर मल्लिका सिंहने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यावर्षी ही अभिनेत्री प्रचंड अशोकमध्ये दिसली. मात्र हा शो काही दिवसांतच फ्लॉप ठरला.
सुंबुल तौकीर खान - फ्लॉप झालेल्या टिव्ही कलाकारांमध्ये सुंबुल तौकीर खानचं नाव देखील आहे. सुंबुलने 2024 मध्ये 'काव्या' मालिकेत भुमिका साकारली होती, मात्र ही मालिका देखील फ्लॉप ठरली.
धीरज धूपर - टिव्ही अभिनेता धीरजचा शो सौभाग्यवती भव आणि रब से है दुआ दोन्हीही फ्लॉप ठरले.