या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकून, आपली स्किल्स वाढवून मोठ्या रकमेचे उत्पन्न कमावता येऊ शकते. (फोटो सौजन्य - Social Media)
सोप्या सिंटॅक्ससह पायथन लँग्वेज डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. पायथन डेव्हलपर्सना मोठ्या कंपन्या चांगले वेतन देतात.
मोबाईल अॅप्लिकेशन तसेच वेब सर्व्हिसेससाठी जावा लँग्वेज स्थिर आहे. जावा डेव्हलपर्सला विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
गूगलने तयार केलेली, गो (Go) लँग्वेज क्लाउड आणि सर्व्हर-साइड सोल्युशन्ससाठी अत्यंत कार्यक्षम आहे. मोठ्या कंपन्या गो डेव्हलपर्सला मोठ्या वेतनासह नोकऱ्या देतात.
वेब डेव्हलपमेंटमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी PHP लँग्वेज आहे. PHP डेव्हलपर्सना वेब आधारित कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
हाय परफॉर्मन्स सॉफ्टवेअर, गेमिंग, आणि सिस्टम प्रोग्रामिंगमध्ये C++ खूप वापरली जाते. ही लँग्वेज शिकल्यास, आपल्याला मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च वेतनाची नोकरी मिळू शकते.