Lunar Eclipse 7 september in India and other countries see photos
भारतीय वेळेनुसार, ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता चंद्रग्रहण सुरु झाले होते ते ३.३० पर्यंत चालले. यावेळी भारताच्या 'अशोक स्तंभ' (Pillar Of Ashoka)च्या मागे चंद्राचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम/choudharyravi)
पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील मिशीदीच्या मिनारमधून 'ब्लड मून' चे अद्भुत असे दृश्य दिसले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कोलकाता येथील स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यामागे देखील ब्लड मूनचा अद्भुत नजारा पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तसेच पश्चिम आशियातील सागरी किनारी वसलेला देश इस्रायलमध्येही ब्लड मूनचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी चंद्र थोडासा लाल-पिवळसर असा पाहायला मिळाला(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तर रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे पूर्ण चंद्रग्रहण होतानाचे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी चंद्र थोडासा पिवळसर आणि लाल होताना दिसला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याशिवाय चंद्रग्रहणादरम्यान युएईमधील बुर्ज खलिफावर ब्लड मून चमकताना दिसला. यावेळी चंद्र लाल बिंदूसारखा दिसून आला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)