Shivali Parab Look
नेहमीच आपल्या विनोदामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवालीने साताऱ्यामध्ये खास निसर्गाच्या सान्निध्यात खूप सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने डार्क रंगाची साडी नेसून कातिल अंदाजात फोटोशूट केले.
डिझायनिंग साडी, फॅन्सी ब्लॅक ब्लाऊज, ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप आणि फॅन्सी इयर रिंग्ज असा लूक पूर्ण करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हटक्या अंदाजात फोटोशूट केले.
शिवालीने या फोटोशूटला ‘वो नज़र…’ आणि ‘जादू है, नशा है, मदहोशियाँ… तुझको भुला के अब जाऊँ कहाँ…’ असे कॅप्शन दिले आहे.
शिवालीच्या ह्या नव्या फोटोंतील सौंदर्यावर आणि दिलखेचक अदांवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
शिवाली कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिच्या फॅन्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.
फोटो सौजन्य - शिवाली परब इन्स्टाग्राम