मलायका अरोरा तिच्या नवीन फोटोशूटच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून इंटरनेटवर तिच्या या नव्या फोटोजने धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. मलायका ५१ वर्षांची आहे मात्र तिच्या फिटनेसकडे पाहून अजूनही तरूण तिच्या प्रेमात वेडे झाल्याचे दिसून येते. मलायकाच्या अदा आणि तिच्या नखऱ्याचे लाखो फॅन्स आहेत. मलायकाचा लुक नेहमीच स्टायलिश आणि आकर्षक असतो. यावेळी तिने बॉडी फिटेड ड्रेस घालून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्यात (फोटो सौजन्य - Instagram)
मलायका तिच्या कोणत्याही फोटोशूटमध्ये सुंदर आणि आकर्षकच दिसते. नुकतेच तिने बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये शूट केले असून न्यूड रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचा लुक पाहून अजूनही ती १६ वर्षांचीच वाटते आहे अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत

या फोटोंमध्ये मलायका अरोरा फिगर-हॅगिंग बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तिच्यातील आत्मविश्वास आणि सुंदरता यांचे उत्तम मिश्रण दिसून येत आहे. तिचा स्टायलिश लुक सोशल मीडियावर चर्चेत आहे

मलायकाच्या या ड्रेसवर संपूर्ण मोत्यांनी डिझाईन करण्यात आले असून तिच्या परफेक्ट फिगरमुळे याला अधिक शोभा आली आहे. मलायकाचा ड्रेस खास आहे कारण तो पारदर्शक बेसवर बनवलेला आहे आणि त्यात चमकदार सिक्विन्स आणि कलाकुसरीचे मणीकाम आहे, ज्यामुळे तो आणखी आकर्षक दिसतोय

मलायका अरोराचा हा आकर्षक बॉडीकॉन ड्रेस कुवेतमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर युसेफ अल जसमी यांनी डिझाइन केला आहे. हा ड्रेस तिच्या ग्लॅमरस आणि आकर्षक लुकला परिपूर्णपणे पूरक आहे.

Malaika Arora recalls a female fan entered in her living room with scissor and she got scared

मलायकाने यासह ग्लॅमरस मेकअप केला असून डार्क ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे आणि यासह केल मोकळे सोडून आपल्या सौंदर्यात अधिक भर घातली आहे. तर केसांची ब्राऊन शेड अधिक आकर्षक दिसतेय






