शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मनसे (MNS) हा पक्ष सरड्यासारखा रंग बदलतो, असं म्हटलं आहे. या विधानाला आता मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड लागत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.