OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार 'हे' काम (फोटो सौजन्य - pinterest)
युजर्ससाठी लेखन आणि कोडींग सोपे आणि सोयीस्कर व्हावे यासाठी कंपनीने ChatGPT मध्ये Canvas इंटरफेस डिझाईन केलं आहे. या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या चॅटच्या शेजारी असलेल्या वर्कस्पेस विंडोप्रमाणे काम करू शकतात. युजर्स कॅनव्हासमध्ये मजकूर जनरेट आणि एडिट करू शकतात. तसेच, कोडिंगचे कामही सहज करता येते.
ChatGPT चा नवा इंटरफेस कॅनव्हास अनेक सुविधा देईल. यामध्ये एडिट, रिराइटिंग आणि कमेंट्स जोडल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे युजर्स त्यांचे काम पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकतील.
Canvas इंटरफेस सध्या बीटा आवृत्तीमध्ये आणला आहे, ज्यामुळे ChatGPT च्या Plus आणि Teams वापरकर्त्यांना फायदा होईल.
OpenAI ने एडिटेबल वर्कस्पेसेसमध्ये AI टूल्सच्या मदतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. यात आर्टिफॅक्ट आणि कोडिंग असिस्टंट कर्सरची सुविधाही दिली जाईल.
कॅनव्हासमध्ये, युजर्स सहजपणे प्रॉम्प्टद्वारे कोणताही ईमेल आणि कोड जनरेट करण्यास सांगू शकतात. कॅनव्हासमध्ये रिअल टाइममध्ये मजकूर एडिट करण्याची क्षमता आहे.
तसेच कॅनव्हासमध्ये ट्यून, भाषा आणि लांबी देखील एडजेस्ट करण्यास सक्षम असाल. कोड एरर तयार केलेल्या कोडिंग टूल्सद्वारे दुरुस्त केल्या जाऊ शकतात. OpenAI येत्या काळात युजर्सना हे फीचर मोफत देणार आहे.