राधिका आपटेने शेअर केला तिचा मॅटर्निटी फोटोशूट. ( फोटो सौजन्य - Social Media )
राधिका यांनी वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की प्रेग्नंसीदरम्यान वाढलेल्या वजन आणि बदललेल्या दिसण्यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
फोटोशूटबद्दल राधिका म्हणाली, "बाळाला जन्म देण्याआधी मी हे फोटोशूट केले होते. त्या वेळी मी माझ्या दिसण्याबद्दल खूप चिंतेत होते. इतक्या वजनात मी स्वतःला कधीच पाहिले नव्हते. माझे शरीर सुजले होते, खूप वेदना होत्या आणि झोपही पूर्ण होत नव्हती. आता आई होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि माझे शरीर पुन्हा बदलायला लागले आहे."
राधिका म्हणते की आई झाल्यानंतर ती आता नवीन आव्हानांना सामोरे जात आहे. राधिका म्हणाली, "आता मी या फोटोंकडे प्रेमाने पाहते, आणि त्याकाळी स्वतःवर एवढं कठोर झाल्याबद्दल वाईट वाटते. आता मला या बदलांमध्ये सौंदर्य दिसते, आणि हे फोटो मी नेहमी जपून ठेवणार आहे."
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये राधिकाला शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये त्या फोटोशूटबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आशिष शाहने या छायाचित्रांना कैद केले आहे. तसेच आउटफिट समर राजपूतने स्टाईल केले आहे.