Stunning pics from Raftaar-Manraj's Sikh and South Indian wedding ceremonies
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. एमीवेने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करत चाहत्यांसोबत लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. त्याने गायिका स्वालिनासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता प्रसिद्ध रॅपर रफ्तारही लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे.
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर लग्नातले फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, रफ्तारनं गर्लफ्रेंड मनराज जवांदासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. मात्र दोघांनीही लग्नाची भनक कोणालाही लागू न देता गुपचूप लग्न उरकले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रफ्तारने आपल्या खासगी आयुष्याची सुरुवात अगदी जोमात पद्धतीने केलेली आहे. रफ्तारच्या लग्नातील फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. रफ्तार आणि मनराजवर चाहत्यांडून शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, रफ्तारने ३१ डिसेंबरला केले असून त्याने आज फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रफ्तार आणि मनराजने दाक्षिणात्य आणि पंजाबी रिती-रिवाजानुसार लग्न केले आहे. त्यामुळे दोघांनी त्या- त्या पद्धतीचा पेहराव केलेला पाहायला मिळत आहे. यावेळी रफ्तार हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याने लग्नाच्या पेहरावावर गॉगल घातला आहे. दोघं खूप आनंदात दिसत आहे. रफ्तारने लग्नसोहळ्यात शर्ट आणि वेष्टी परिधान केली होती, तर मनराजने सुंदर दाक्षिणात्य साडी नेसली होती.
रफ्तार एका मल्याळम कुटुंबातील असून मनराज पंजाबी कुटुंबीयांतून येते. दोघांनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्नगाठ बांधली. रफ्तारने घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा फॅशन स्टायलिस्ट मनराज जवंदाबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मनराज ही एक फॅशन स्टायलिस्ट आणि अभिनेत्रीही आहे. तर, रफ्तारचं खरं नाव दिलिन नायर आहे. त्याचं स्टेज नाव रफ्तार असं आहे.
डिसेंबर २०१६मध्ये रफ्तारने कोमल वोहराशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नाच्या आधी दोघं पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण लग्नाच्या काही वर्षांनी २०२०मध्ये रफ्तारने कोमलबरोबर घटफोस्ट घेण्याचं निश्चित केलं. परंतु, कोरोनामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे रफ्तार आणि कोमलने २०२२मध्ये घटस्फोट घेतला. ६ ऑक्टोबर २०२२ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली.