Video – ‘रनवे 34’ मधील पहिले गाणे ‘मित्रा रे’ रिलीज, अजय देवगणच्या वाढदिवसाचा साधला मुहूर्त
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस (Ajay Devgan Birthday) आहे. सकाळपासूनच त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.आता 'रनवे 34'च्या निर्मात्यांनी अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. 'मित्रा रे...' (Mitra Song Out)असे या गाण्याचे बोल आहेत. जे अरिजित सिंग आणि जसलीन रॉयल यांनी गायले आहे. अजयनेही हे गाणे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.