गोकुळाष्टमीचे निमित्त साधून नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘अल्ट्रा म्युझिक’ प्रस्तुत ‘गोविंदा आया आया’(Govinda Aaya Aaya Song) गाणं जबरदस्त गाजत असून संतोष जुवेकर( Santosh juvekar) कान्हाच्या रूपात येऊन गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना भुरळ घालतो आहे. ‘दिव्य कुमार’(Divya Kumar) यांच्या रांगड्या आवजातलं हे गाणं ‘मुकेश शर्मा’ यांनी शब्दबद्ध केले असून ‘काशी कश्यप’ यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसेच गाण्याचा ठेका धरून ‘सिद्धेश दळवी’ यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.