श्रावणात एका विशिष्ट रंगाला शुभ मानले जाते
श्रावण महिना केवळ पावसाळ्याच्या आगमनाचाच नाही तर भक्ती-आध्यात्माचा महिना म्हणून ओळखला जातो
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात
श्रावण महिन्यात हिरवी साडी आणि दागिने घालून 16 शृंगार करण्याची परंपरा आहे
असे म्हणतात की, हिरवा रंग भगवान शंकराला फार प्रिय आहे. हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार, निसर्ग हे देवी पार्वतीचे रूप आहे
श्रावण महिना पावसाळ्यात येतो. या महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. त्याचबरोबर हिरवा रंग सकारात्मकतेची प्रतीक म्हणून असे मानले जाते