हातांवर मेहंदी काढल्यानंतर आपले हात आधी छान दिसतात. सध्या सिम्पल मेंहदी डिझाइन्समध्ये हातांच्या बोटांवर क्रिस-क्रॉस डिझाइन काढून मध्य भागी फुले काढा. यामुळे तुमचा वेळीसुद्धा वाचेल.
मेहेंदीमध्ये फुले असलेली मेहंदी हातांवर अधिक सुंदर दिसते. याला मिनिमलिस्ट डिझाइन असे बोलतात. ही मेहंदी तुम्ही तळहातांवर लावू शकता.
हल्ली सगळीकडे अरेबिक मेहंदीचा ट्रेंड आला आहे. हातांच्या मध्यभागापासून या मेहंदीला सुरुवात केली जाते. कमीत कमी डिझाईन हवी असल्यास तुम्ही ही मेहंदी काढू शकता.
कमीत कमी डिझाईन असलेली मेहंदी हातांवर अतिशय क्लासी दिसते. यामध्ये तुम्ही प्रत्येक बोटावर रेषा काढून त्यात सुंदर डिझाईन काढू शकता.त्यानंतर रेषांच्या मधोमध छोटी छोटी फुल किंवा इतर कोणतीही डिझाईन काढता येईल.
काहींना पूर्णपणे हात भरून मेहंदी हवी असते. बारीक नक्षीकाम, फुले यामुळे भरलेली मेहंदी हातांवर अधिक उठून दिसते.