नाश्त्यामध्ये तुम्ही भिजवलेले चणे वा काळे चणे खाणे हे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. आरोग्यासाठी याचा कोणत्या पद्धतीने फायदा होतो हे आपण जाणून घेऊया
भिजवलेल्या चण्यामध्ये फायबर आढळते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील मजबूत होते
चण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेहाचे रुग्ण भिजवलेले हरभरे खाऊ शकतात
चण्यामध्ये प्रथिने आणि फायबर आढळते, चणे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. तसंच चणे खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही
भिजवलेल्या चण्यात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात
भिजवलेले चणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. उच्च कोलेस्ट्रॉल असलेले रुग्ण नाश्त्यात भिजवलेले चणे खाऊ शकतात आणि कोलेस्ट्रॉवर कंट्रोल आणू शकतात