'या' आहेत भारतीय नसून भारतीय संस्कृतीचा भाग बनलेले खाद्यपदार्थ. (फोटो सौजन्य - Social Media)
भारतातील लोकांचा आवडता चहा प्रत्यक्षात ब्रिटिशांनी १९व्या शतकात चीनमधून आणला होता. चहाचे उत्पादन वाढवून ब्रिटिशांनी चीनवरील अवलंबित्व कमी केले.
उत्तर भारतात विशेषकरून लोकप्रिय असलेले राजमा मूळचे मध्य अमेरिकेतील, विशेषतः मेक्सिकोतील आहे. पोर्तुगीजांनी भारतात हे बी आणले.
भारतातील प्रसिद्ध गोड पदार्थ जलेबी मूळची पर्शियन असून तिथे ती 'झुलबिया' या नावाने ओळखली जाते. पर्शियन व्यापारांनी हा पदार्थ भारतात आणला.
भारतात समोसा म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ मूळचा मध्य आशियाई असून तिथे 'संबोसा' नावाने ओळखला जातो. मध्य आशियातून व्यापार्यांनी भारतात आणलेल्या समोश्यामध्ये सुरुवातीला मांस भरले जायचे.
प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ गुलाब जामुनचा उगम पर्शियात आहे, जिथे तो 'लुकमत-अल-कादी' नावाने बनवला जायचा.