बॉलीवूड स्टार सनी लिओनीने नुकताच तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँड 'स्टार स्ट्रक बाय सनी लिओनी' हा प्रसिद्ध केला आहे. या ब्रँड साठी सनीने तिचे अप्रतिम फोटो शूट केले असून तिने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत.
या फोटो मध्ये सनीने काळ्या रंगाचा स्लिव्हलेस गाऊन परिधान केला असून, या ड्रेस मध्ये ती खूप सुंदर, रेखीव आणि हॉट दिसत आहे. सनीने हे फोटो तिच्या वेगवेगळ्या अंदाजात पोज देत क्लिक केले आहेत.
सनीने या ड्रेसवरील लुक पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःचे ब्युटी ब्रँडचा वापर केला आहे. तिने या काळया रंगाच्या लांबलचक गाऊनवर ब्रॉड आयलायनर, डार्क आयमेकअप, जाड काजळ, रेखीव मस्कारा, न्यूड गुलाबी लिपस्टिक आणि हलकासा ब्लश या सामग्रीचा वापर केला आहे.
तसेच या मेकअपसह तिने या गाऊनवर केसांची एक घट्ट पोनी, हातात तीन आंगठ्या आणि कानात डिजाईन ईअररिंग घातल्या आहेत. या लुकमध्ये ती एकदम आकर्षित आणि मेकअपमुळे ती एकदम क्लासी दिसत आहे.
सनीने या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो ला चकत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एका नेटकाऱ्याने, सोशल मीडियावरील वातावरण तापले आहे... असा प्रतिसाद दिला असून, दुसऱ्या नेटकाऱ्याने सनीला क्वीन म्हंटले आहे. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.