तमन्ना भाटिया बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर देखील नेहमीच ऍक्टिव्ह असते. तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.
तमन्नाने नुकतेच तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय स्टाईलिश दिसत आहे. तमन्नाने या फोटोंमध्ये लूज शर्ट आणि पॅन्ट कॅरी केली आहे.
तमन्नाने न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला असून तिचे केस बांधले आहेत. तिचा लुक दाखवत तमन्नाने एकामागून एक सिझलिंग पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
तमन्नाच्या लवकरच ‘गुरथुंडा सीथाकलम’ या तेलगू चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तमन्ना ‘बबली बाउंसर’, ‘बोलो चुडियाँ’ आणि ‘प्लॅन ए प्लान बी’ या हिंदी चित्रपटांमध्येही दिसणार आहे.