संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट (Tamasha Live Teaser) टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील (Sachit Patil), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), हेमांगी कवी (Hemangi Kavi), पुष्कर जोग (Pushkar Jog), नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार ? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना २४ जूनला मिळणार आहे. याशिवाय ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.