Most Expensive Smartphones: हे आहेत जगातील 5 सर्वात महागडे अँड्रॉईड स्मार्टफोन्स, किंमत वाचून चक्रवाल
तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महागड्या अँड्रॉइड स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि ते फोन कोणत्या कंपनीचे आहेत? चला जाणून घेऊया.
Xiaomi Redmi K20 Pro सिग्नेचर एडिशन हा Xiaomi चा आगामी फोन आहे, ज्याची किंमत सुमारे 4,80,000 रुपये असू शकते. या फोनमध्ये 6.39 इंच स्क्रीन, 2.8GHz, ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट, 48MP+13MP+8MP ट्रिपल बॅक कॅमेरा सेटअप, असू शकतो.
या यादीतील दुसऱ्या फोनचे नाव Lamborghini 88 Tauri आहे. या फोनची किंमत 3,60,000 रुपये आहे. या फोनमध्ये 5 इंच स्क्रीन, प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन 801, क्वाड कोअर, 2.3 GHz चिपसेट, जलद चार्जिंग सपोर्टसह 3400mAh बॅटरी, 20MP बॅक कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
या यादीतील तिसऱ्या फोनचे नाव Huawei Mate 30 RS Porsche Design आहे. या स्मार्टफोनची किंमत 2,14,990 रुपये असू शकते. हा फोन अजून लाँच झालेला नाही. यात 2.86 GHz प्रोसेसरसह Kirin 990 Octa Core चिपसेट, 12GB RAM, 512GB स्टोरेज, जलद चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी, असू शकते.
या यादीतील चौथा फोन देखील Huawei कंपनीचा आहे, ज्याचे नाव Huawei Mate X2 आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC यासह अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. या फोनची किंमत 2,04,999 रुपये आहे.
या यादीतील पाचवा फोन Samsung Galaxy Z Fold 6 Ultra आहे, जो या वर्षी जुलै महिन्यात लाँच होऊ शकतो. भारतीय चलनात या फोनची किंमत 1,99,990 रुपये असू शकते.