तेजस्विनीचा जन्म २३ मे १९८६ ला पुण्यात झाला. रणजित पंडित आणि ज्योती चांदेकर हे तिचे आई वडील आहेत.
तिच्या आई ज्योती चांदेकर याही अभिनेत्री आहेत.
अभिनयाशिवाय तेजस्विनी एक यशस्वी उद्योजिकाही आहे. तिचा तेजाज्ञा नावाचा ब्रँड आज देशांतर्गत पातळीवर गाजतो आहे.
‘क्रिएटिव्ह वाइब’ च्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश केलाय
नवरात्री उत्सव आणि तेजस्विनी हे एक वेगळंच समीकरण आहे. प्रत्येक नवरात्री उत्सवात तिचे खास केलेले फोटोशूट्स खूप गाजतात. प्रत्येक वर्षी स्त्रीची वेगवेगळी रूपं ती फोटोज् मधून दाखवते
सिंधुताई सपकाळ सारख्या संवेदनशील चित्रपटातून तिच्या अभिनयातील साधेपणा पाहायला मिळाला.
साचेबद्ध किंवा एखाद्या चौकटीत अडकून न राहता नवनवीन विषय हाताळायचे मला आवडतं असल्याचं तेजस्विनी सांगते.
मराठी मनोरंजनविश्वात सध्या चर्चा असलेल्या रानबाजार या वेब सिरिजध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचा अत्यंत बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.