अजय देवगणच्या ‘रनवे 34’ मधील ‘द फॉल’ गाणं रिलीज, प्रेक्षकांनी अनुभवला वैमानिकाचा संघर्ष
‘रनवे 34’ (Runway 34) चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात सिनेमा बघण्याची इच्छा निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ मार्चला रिलीज झाला होता. आज या चित्रपटातील आणखी एक नवीन गाणं ‘द फॉल’ (The Fall) रिलीज झालं आहे. जसलीन रॉयलने (Jasleen Royal) हे गाणं गायलं आहे. (The Fall Song Release) आदित्य शर्माने (Aaditya Sharma) हे गाणं लिहिलं आहे. एकूण २ मिनिट ३६ सेकंदांच्या या गाण्याच्या व्हिडिओमध्ये खराब हवामानामुळे अजय देवगण (Ajay Devgan) विमानाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पॅनोरमा म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं स्ट्रीम करण्यात आलं आहे. सत्य घटनांवर आधारित ‘रनवे 34’ हा चित्रपट २९ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), बोमन इराणी आणि रकुल प्रित सिंह हे सगळे मुख्य भूमिकेत आहेत.