टाटा कंपनी बनवणार मिलिटरी एअरक्राफ्ट. (फोटो सौजन्य - Social Media)
2021 मध्ये भारत आणि स्पेनमध्ये 56 C-295 विमानांसाठी 21,935 कोटी रुपयांचा करार झाला होता. त्याअंतर्गत पहिल्या 16 विमानांपैकी 6 विमान स्पेनहून भारतात पोहोचली आहेत.
उर्वरित 40 C-295 ट्रांसपोर्ट विमानांची निर्मिती वडोदरा येथील टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्समध्ये केली जाईल. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय लष्करासाठी FAL (फायनल असेंबली लाइन) द्वारे विमान बनवले जाणार आहे.
हैदराबाद येथील टाटा फॅसिलिटीमध्ये विमानांचे महत्त्वपूर्ण भाग बनवले जातील, ज्यांना नंतर वडोदऱ्यात पाठवले जाईल, जिथे भारतीय लष्करासाठी C-295 विमानांची पूर्ण निर्मिती केली जाईल. C-295 प्रकल्प ऐतिहासिक आहे कारण पहिल्यांदाच भारतात एखाद्या खासगी कंपनीद्वारे लष्करी विमानांची निर्मिती होणार आहे.
वडोदरा येथे टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनानंतर यंदाच्या वर्षीच C-295 विमानांचे उत्पादन सुरू होईल. पहिल्या विमानाची डिलिव्हरी 2026 पर्यंत होईल आणि 2031 पर्यंत सर्व 40 विमानांची डिलिव्हरी पूर्ण होईल.
उद्घाटन सोहळ्यात PM मोदींनी रतन टाटा यांना स्मरण करून सांगितले की रतन टाटा यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे देशाला पहिली विमानसेवा मिळाली होती आणि आता टाटा ग्रुप पहिल्यांदा भारतात लष्करी विमानांची निर्मिती करणार आहे. या टाटा-एअरबस सहकार्यातून भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.