'द व्हॅक्सिन वॉर'चा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, सप्तमी गौडा आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. पल्लवी जोशी आणि आय अॅम बुद्ध यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.