'या' आहेत भारतातील सगळ्यात महागड्या साड्या
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. पैठणी साडी नेसल्यानंतर रॉयल लुक दिसतो. या साडीची किंमत २ लाखांपासून ते अगदी १० लाखांपर्यंत आहे.
दक्षिण भारतातील कांचीवरम साडी लग्नसोहळ्यांमध्ये नेसली जाते. जड रेशीम आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाणारी कांजीवरम साडी हातमागावर विणली जाते. कांजीवरम साडीची साधारण किंमत दीड लाख ते ७ लाख रुपये एवढी आहे.
Untitled design (19)
भारतातील साड्यांची राणी म्हणून बनारसी साडीची विशेष ओळख आहे. ओरिजनल रेशीम, सोन्या-चांदीच्या जरीचे काम आणि पारंपरिक नक्षीकाम करून तयार केलेल्या साडीची किंमत साधारण २ लाख ते ८ लाख रुपये किंवा त्याच्या पेक्षा जास्त आहे.
आंध्रप्रदेशची पोचमपल्ली इकत साडी साध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होताना दिसत आहे. ही साडी अस्सल रेशमी धाग्यांचा वापर करून बनवली जाते. साडीची किंमत ८० हजार ते ४ लाख रुपयांपर्यंत आहे.