गर्भधारणा, मातृत्व आणि रजोनिवृत्ती इत्यादी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे फार आवश्यक आहे. शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांचे आरोग्य बिघडते. महिलांच्या शरीराला प्रथिने, आरोग्यदायी चरबी, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी आवश्यक घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दैनंदिन आहारात वेग्वेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – istock)
बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या सुकामेव्यामधील आरोग्यदायी फॅट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी सुका मेवा खावा.
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. अशावेळी बदाम, अंजीर आणि तीळ यांसारख्या सुक्या मेव्याचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे हाडे मजबूत राहतात.
मनुका, सुकी अंजीर आणि खजूर यामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे संतुलित आहारासोबतच नियमित काळे मनुके आणि बदाम खाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
विटामिन ई, बायोटिन आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले बदाम आणि अक्रोड त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे केसांना सुद्धा आवश्यक पोषण मिळते.
सुक्या फळांमध्ये फायबर असते, त्यामुळे आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे आवश्यक सेवन करावे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.