'हे' आहेत देशातील श्रीमंत गुंतवणूकदार. (फोटो सौजन्य - Social Media)
डी मार्टचे मालक राधाकिशन दमाणी यांच्या पोर्टफोलिओमध्ये DMart, Tata Motors, Gati, India Cements आणि VST Industries Ltd., Avenue Supermarts Ltd. मधील शेअर्स आहेत. हे भारतातील श्रीमंत गुंतवणूकदार आहेत.
रामदेव अग्रवाल मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्वीसेज लिमिटेडचे को. फाउंडर आहेत. ते मारुती सुझुकी, सन फार्मास्युटिकल, भारत वायर रोप्स आणि HDFC बँकेमध्ये गुंतवणूक करतात. रामदेव अग्रवाल भारतातील श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.
९०च्या दशकात रमेश दमाणी यांनी शेअर मार्केटमध्ये आपले पाऊल ठेवले. आज त्यांचे गोदरेज इंडस्ट्रीज, गोल्डियम इंटरनॅशनल तसेच पनामा पेट्रोटेकसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत.
आशिष धवन सेंट्रल स्क्वेअर फाऊंडेशनचे CEO असून अशोक युनिव्हर्सिटी उभी करण्यात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. ते देशातील श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक असून त्यांनी इक्विटास होल्डिंग्स लि., आयडीएफसी लि., ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. आणि बिर्लासॉफ्ट लि. सारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.
केडिया सिक्युरिटीजचे मालक विजय केडिया देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या पॉर्टफोलिओमध्ये रेप्रो इंडिया, महिंद्रा हॉलिडेज, इलेकॉन इंजिनिअरिंगसारख्या कंपनीचा समावेश आहे.