रांगोळी
वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला साडी नेसतात. त्यामुळे तुम्ही साडीची डिझाईन काढून त्यात छोटेसे वडाचे झाड काढू शकता. जे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसेल.
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला विशेष महत्व आहे. त्यामुळे अंगणात तुम्ही सुंदर वडाचे पान काढू शकता. जे अधिक उठावदार आणि सुंदर दिसेल.
कमीत कमी वेळात जर तुम्हाला रांगोळी काढ्याची असेल तर तुम्ही वडाचे झाड काढून त्याच्या बाजूला पूजेचा कलश आणि लक्ष्मीचं पाऊल आणि स्वस्तिक काढू शकता.
सणाच्या दिवशी घरामध्ये खूप घाईगडबड होते. अशावेळी तुम्ही वडाचे झाड काढून त्याच्या बाजूने सुंदर डिझाईन काढू शकता.
वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला साज शृंगार करून नटतात. त्यामुळे तुम्ही रांगोळीमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, गळ्यातील नेकलेस आणि नथ काढू शकता.