अभिनेत्री विद्या बालनचे अनंत-राधिकाच्या लग्नातील लाला साडीमधील फोटो पहा. vidya balan (फोटो सौजन्य-Instagram)
अभिनेत्री विद्या बालनने अनंत-राधिकाच्या लग्नात लाल भडक रंगाची साडी परिधान केली होती, या लाला साडीचा पदर सोनेरी रंगाच्या नक्षीदार डिझाईनमध्ये होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
या साडीमधील विद्या बालनचा लुक एकदम साऊथ इंडियन दिसत होता त्यामुळे हा लुक पाहून सगळ्याच्या नजर तिच्या कडे खेळल्या होत्या. विद्या बालनने आपल्या हटके अंदाजात या साडीमधील फोटो क्लीक केले आहेत.
विद्या बालनने या साडीवर मॅचिंग अशी पर्स देखील घेतली आहे. भडक लाल रंगाच्या साडी ही लाल-सोनेरी रंगाची पर्स आणखी उठून दिसत आहे. त्यामुळे तिच्या या साडीतील सौंदर्यावर भर पडली आहे.
विद्या बालनने या साडीवरील लुक पूर्णकरण्यासाठी आयलायनर, गुलाबी ब्लुश, मस्कारा आणि लाल लिपस्टिक या सामग्रीचा वापर करून मेकअप केला आहे. तसेच यासह तिने कानात झुम्मके घातले आहेत. या सगळ्यामध्ये विद्या बालन खूप साधी आणि आकर्षित दिसत आहे.
तसेच या साडीवर विद्या बालनने पाहत गोल्डन जाड बांगड्या घातल्या आहेत, या सगळ्यासह तिने केसात सुंदर मोगऱ्याचा गजरासुद्धा मळाला आहे या सगळ्या गोष्टीमुळे तिचा लुक खूप परिपूर्ण दिसत आहे.