देशातील टॉप 5 Best Film इन्स्टिटयूट, जाणून घ्या. ( फोटो सौजन्य - Social Media )
'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे' हे देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या चित्रपट शैक्षणिक संस्थेपैकी एक आहे. भारतातील सर्वात प्रख्यात फिल्म शिक्षण संस्था असून, येथे डायरेक्शन, ऍक्टिंग, सिनेमॅटोग्राफीसह विविध कोर्सेस शिकवले जातात.
'सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), कोलकाता' हे एक थोर दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या नावाने सुरु झालेले एक शैक्षणिक संस्थान आहे. मुळात, फिल्म निर्मिती आणि तांत्रिक कौशल्यांसाठी ही उत्कृष्ट संस्था मानली जाते.
'व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई' दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीमध्ये स्थित एक शैक्षणिक संस्था आहे. येथे फिल्म, अभिनय, ऍनिमेशन आणि मीडियाशी संबंधित विविध कोर्सेस शिकवले जातात.
नवी दिल्ली येथे स्थित 'राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD)' अभिनय आणि नाट्यकलेचे शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. सिनेक्षेत्रात करिअर घडवणाऱ्या उमेदवारांसाठी या जागेची ओढ अविश्वसनीय आहे.
'एशियन एकेडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (AAFT), नोएडा' प्रसिद्ध सिने शिक्षण संस्था असून, येथे फिल्म, एनिमेशन, फोटोग्राफी आणि मीडियासंबंधित अनेक कोर्सेस शिकवले जातात. मुळात, या सर्व संस्था त्यांच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धती आणि आधुनिक सुविधांसाठी ओळखल्या जातात.