विमानाला पक्षांची धडक झाल्यावर काय होते? कसा झाला दक्षिण कोरियातील अपघात, जाणून घ्या
रविवारी सकाळी मुआन विमानतळावर उड्डाण करणारे एक विमान पक्ष्याला धडकले. या अपघातानंतर लँडिंग गियर फेल झाले, ज्यामुळे विमान भिंतीवर धडकले आणि स्फोटासारखा भीषण अपघात झाला. परिणामी, विमानातील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला
पक्षी आणि विमान यांच्या टक्करचा पहिला प्रसंग 1905 मध्ये नोंदवला गेला होता. ओहायो येथे ओरविल राइट यांनी मक्याच्या शेताजवळ पक्षी विमानाला धडकल्याची नोंद केली होती
त्यानंतर जगभर अशा असंख्य घटना घडल्या असून, आतापर्यंत 250 हून अधिक विमाने यामुळे नष्ट झाली आहेत
विमान लँडिंग किंवा टेकऑफ करताना कमी उंचीवर असल्यामुळे पक्ष्यांशी टक्कर होण्याची शक्यता जास्त असते. तब्बल 90% घटनांमध्ये पक्षी विमानतळाच्या जवळच विमानाला धडकतात
पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाच्या इंजिनला नुकसान होण्याची शक्यता असते. काही वेळा इंजिन पूर्णपणे बंद पडते किंवा त्यात आग लागते
रडारद्वारे पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते आणि पायलट्सना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. तरीही, अचानक समोर आलेल्या पक्ष्यांमुळे गंभीर अपघात होऊ शकतो
पक्ष्यांच्या टक्करांचा धोका टाळण्यासाठी टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो. परंतु तरीही अशा घटना पूर्णतः टाळता येत नाहीत