फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला लखलखत्या ताऱ्यांनी भरलेल्या अवकाशाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला शहरापासून दूर ग्रामीण भागात जावे लागेल.
एका जंगलात जाऊन तेथून तारे पाहिलेत तर नक्कीच जुन्या काळाची आठवण येईल. मुळात, तारे आहे तिथेच आहेत. त्यांच्या संख्येत काहीच कमतरता आली नाही.
मुळात, आपल्या शहरातील वाढत्या प्रकाशामुळे आकाशातील तारे दिसणे बंद झाले आहे. याला कारणीभूत प्रकाश प्रदूषण आहे, जे शहरात मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकाश प्रदूषण कमी आहे, त्या ठिकाणी या दृश्यांचा आस्वाद घेता येऊ शकतो.
मुळात, शहरीकरणाने अवकाशातील लखलखणारे तारे गायब झाल्याचे भासून येत आहे, त्यामुळे निसर्गाला जपणे काळाची गरज झाली आहे.