Crocodile
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मगरीचे अश्रू हे दु:खाचे किंवा भावनिक नसून तिच्या शारिराच्या संरक्षणात्मक प्रतिक्रिया असते
जेव्हा मगर भक्ष्याला खात असते, त्यावेळी तिच्या जबड्यांची हालचाल वारंवार होत असते. यामुळे तिच्या अश्रू ग्रंथींवर दबाव पडतो आणि तिच्या डोळ्याभोवती पाणी दिसते
शास्त्रज्ञांच्या मते, मगर भक्ष्य खाताना दिसवभर पाण्यात राहिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतात
भावनिक होणे हे केवळ मानवांमध्येच आढळते. आनंद, दु:ख, राग अशा वेगवेगळ्या भावनांमुळे माणसाला रडू कोसळते
प्राणी-पक्ष्यांमध्ये ही क्रिया फक्त संरक्षणासाठी असते. त्याचा दु:ख, आनंद, वेदानेशी कोणत्याही संबंध नसतो आणि ही एक जैविक क्रिया आहे
यामुळे मगरीचे अश्रू ही केवळ एक म्हण असून ती व्यक्तीच्या खोट्या भावना दाखवण्यासाठी वापरली जाते