Fun Facts: पुंगीच्या तालावर का डोलतो नाग? कान नसताना कसा ऐकतो आवाज? कारण वाचून व्हाल अचंबित
जेव्हा आपण सापाला पुंगीच्या तालावर नाचताना बघतो, तेव्हा ते दृष्य अगदी अद्भूत असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, साप पुंगीच्या तालावर का नाचतात?
खरं तर, सापांना कान नसतात. साप केवळ आवाजाचा अनुभव करू शकतात. साप पुंगीच्या तालावर नाचत नाहीत, पुंगीच्या आवाजापासून निर्माण होणाऱ्या कंपनांवर नाचतात.
जेव्हा पुंगी वाजवली जाते, तेव्हा त्यातून कंपन निर्माण होतात. ही कंपन हवा आणि जमीनीच्या माध्यमातून पसरतात. सापाच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची संवेदनशीलता असते, ज्याच्या मदतीने तो कंपनांचा अनुभव करू शकतो.
सापाचा जबडा आणि त्याच्या शरीरातील हाडं या कंपनांचा अगदी सहजपणे अनुभव करू शकतात. जेव्हा पुंगी वाजवली जाते, तेव्हा साप या कंपनांचा अनुभव करतो आणि त्याचं डोकं डोलावतो. यामुळे साप नाचत आहे, असं आपल्याला वाटतं.
सापाची त्वचा आणि त्याच्या शरीराची रचना इतकी संवेदनशील असते की त्याला अगदी लहानशी हालचालही जाणवते.
साप केवळ कंपनांसोबतच आजूबाजूच्या हालचाली देखील ओळखू शकतो. म्हणूनच तो सर्पमित्राच्या हातांच्या हालचाली आणि पुंगीच्या हालचाली पाहून प्रतिक्रिया देतो. यामुळेच आपल्याला असं वाटतं की जेव्हा पुंगी वाजवली जाते, त्या तालावर साप डोलतो. थोडक्यात काय तर साप पुंगीचा आवाज ऐकत नाही तर केवळ सर्पमित्राच्या हालचालींंवर प्रतिक्रिया देतो.