Goosebumps
आपल्या शरिरात दिवसभरात अनेक बदल होत असतात. ज्यावर आपण कधी विचार देखील केला नसेल.
यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे आपल्या अंगावर काटा येणे. पण तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या अंगावर काटा का व कधी येतो?
तर माणूस संवेदनशील प्राणी असल्याने वेगवेगळ्या भावाना आपल्या शरिरात निर्माण होत असतात. आनंद, दु:ख, राग, भिती यांसारख्या विविध भावना आपल्यात उत्पन्न होत असतात.
ज्या वेळी दुखाच्या, आनंदाच्या, भीती, आश्चर्य यांसारख्या भावना आपल्याला येत असतात, त्यावेळी आपल्या शरीरात एक विशिष्ट हार्मोन तयार होते असते. ज्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू सैल होतात.
हे स्नायू सैल झाले की, आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात, म्हणजेच अंगावर काटा येतो. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होत असता. त्यावेळळी अंगावर Goosebumps म्हणजे काटा येतो. आपल्या शरीरावरचे केस उभे राहतात.