हिवाळ्यात फिरण्यासाठी महाबळेश्वरच भारी (फोटो सौजन्य: istock)
फळांचा आणि पदार्थांचा आनंद: हिवाळा हा महाबळेश्वरच्या ताज्या स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे. याशिवाय, स्ट्रॉबेरी क्रश, क्रीम, आणि गरमागरम स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
सर्वांत कमी गर्दी: उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्याच्या सुरवातीच्या मोसमात पर्यटकांची संख्या कमी असते. त्यामुळे निसर्गाचा शांतपणे अनुभव घेता येतो आणि ठिकाणेही खूप शांत वाटतात.
भटकंतीसाठी उत्तम वेळ: महाबळेश्वरमधील विविध पॉईंट्स, जसे की आर्थर सीट पॉईंट आणि वेण्णा लेक, या हिवाळ्यात अधिक सुंदर वाटतात. उन्हाच्या झळा नसल्यामुळे भटकंती अधिक आरामदायी होते.
दुर्मिळ धुक्याचा अनुभव: हिवाळ्यात महाबळेश्वरमध्ये पहाटे आणि रात्री धुक्याचा वेढा असतो. पर्वतांवरून दिसणारे धुके आणि दाट झाडीतून वाहणारे कुंद वारे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
थंड आणि आल्हाददायक हवामान: हिवाळ्यात महाबळेश्वरचे तापमान १०-१५ अंशांपर्यंत खाली जाते, जे थंड आणि आल्हाददायक अनुभव देते. थंडगार वाऱ्यांमध्ये गवताच्या हिरव्यागार पठारांवर फिरण्याचा आनंद काही औरच असतो.