फोटो सौजन्य - pinterest
आज 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात World Wide Web day साजरा केला जातो. अन्न , वस्त्र , निवारा या मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचे नावही जोडले गेले आहे. आजच्या काळात माणसाला अन्न , कपडे , घर मिळत नसले तरी देखील त्याला इंटरनेटची गरज आहे.
बरेच लोक इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब यांना समान गोष्ट मानतात. पण वर्ल्ड वाइड वेब हा ऑनलाइन पेजचा समूह आहे , तर इंटरनेट हे एक मोठं नेटवर्क आहे ज्याद्वारे जगभरातील संगणक आणि उपकरणे जोडली जातात.
इंटरनेटवरील ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा ब्राउझरद्वारे तुम्ही कोणताही डेटा ॲक्सेस करता, तो सर्व वर्ल्ड वाइड वेबमध्ये येतो. संगणकीय भाषेत, वर्ल्ड वाइड वेब हे ऑनलाइन सामग्री किंवा इंटरनेट सामग्रीचे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) नेटवर्क आहे.
इंटरनेट हे एक मोठे व्यासपीठ आहे आणि वर्ल्ड वाइड वेब या प्लॅटफॉर्मवर डेटा उपलब्ध करून देते. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब दोन्ही एकत्र उपस्थित नसल्यास, कोणीही सहजपणे इंटरनेट वापरू शकत नाही .
इंटरनेटचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे, याची प्रत्येकालाचा कल्पना आहे. सर्वांनाच दर काही मिनिटांनी सोशल मीडिया तपासण्याचे व्यसन लागले आहे. समजा तुमचा मोबाईल रिचार्ज संपला तर तुम्ही त्याशिवाय दोन दिवसही घालवू शकता का?
सध्या निम्म्याहून अधिक जग इंटरनेटवर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक दिवस इंटरनेट बंद राहिल्यास संपूर्ण जगाची एकमेकांशी असलेली कनेक्टिव्हिटी थांबेल आणि कंपन्यांमधील काम बंद होईल.