Year Ender 2024: पंकज उधास ते उस्ताद झाकीर हुसैन…; २०२४ या वर्षी जगाचा निरोप घेणारे सिने जगतातील सितारे
उस्ताद रशीद खान- Ustaad Rashid Khan प्रसिद्ध संगीतकार उस्ताद राशिद खान यांचे ९ जानेवारी २०२४ रोजी कोलकाता येथे निधन झाले. त्यांचे निधन प्रोस्टेट कॅन्सरमुळे झाले. ५५ वर्षीय संगीतकाराला २०२२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज जरीही ते आपल्यात नसले तरीही ते आपल्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात आहेत.
श्रीला मुजूमदार- Sreela Majumdar ६५ वर्षीय बंगाली आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रीला मुजूमदार यांचे निधन २७ जानेवारी २०२४ मध्ये झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून त्या कॅन्सर या दुर्धर आजारासोबत लढा देत होत्या. कॅन्सर आजारासोबतचा त्यांचा लढा अयशस्वी ठरला. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये चाहत्यांना अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
सुहानी भटनागर- Suhani Bhatnagar ‘दंगल’ चित्रपटात बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरने वयाच्या १९ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ती डर्माटोमायोसिटिस नावाच्या दुर्मिळ आजारासोबत लढा देत होती. अभिनेत्रीने इतक्या लहान वयात जगाचा निरोप घेतल्यामुळे तिच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली होती.
ऋतुराज सिंह- Rituraj Singh ५९ वर्षीय सिनेअभिनेते ऋतुराज सिंह यांचे १९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऋतुराज सिंह यांनी ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. कायमच अभिनेता चाहत्यांच्या गंभीर आणि प्रभावी अभिनयासाठी स्मरणात राहिला.
पंकज उधास- Pankaj Udhas प्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक हिट गझल अल्बमची निर्मिती केली आहे, त्यांची गझल म्हणजेच त्यांची विशेष ओळख आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' चित्रपटातील 'चिठी आयी है' हे गाणे त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.
फिरोज खान- Feroz Khan टीव्ही आणि चित्रपट अभिनेते फिरोज खान यांचे 23 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'भाभी जी घर पर हैं', 'जिजाजी छत पर हैं' आणि 'शक्तिमान' यांसारख्या शोसाठी ते ओळखले जातात. याशिवाय त्यांनी 'फूल और आग', 'कभी क्रांती कभी जंग', 'डुप्लिकेट शोले', यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
मेनका इराणी- Menaka Irani बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आणि सिनेदिग्दर्शक साजिद खान यांची आई मेनका इराणी यांचे २६ जुलै २०२४ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
आशा शर्मा- Asha Sharma टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आशा शर्मा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 1975 मध्ये 'कागज की नौका' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 'कयामत से कयामत तक', 'चांदनी', 'दामिनी', 'हम', 'प्यार तो होना ही था' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले.
विकास सेठी- Vikas Sethi टीव्ही अभिनेता विकास सेठीचे ८ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक येथील त्याच्या राहत्या घरी निधन झाले. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'कहीं तो होगा', 'कसौटी जिंदगी की' सारख्या शोच्या माध्यमातून तो प्रसिद्धी झोतात आला.
विपिन रेशमिया- Vipin Reshammiya संगीत दिग्दर्शक आणि हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया यांचे १८ सप्टेंबर रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. ‘इन्साफ की जंग’ आणि ‘तेरा सुरूर’ या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.
अतुल परचुरे- Atul Parchure प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अतुल परचुरे त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी कायम स्मरणात राहतील.
टोनी मिरकंदानी- Tony Mirrcandani अभिनेता-लेखक टोनी मिरकंदानी यांचे ४ नोव्हेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये काही आरोग्यासंबंधित समस्यांमुळे निधन झाले. त्यांनी 'गदर', 'कोई मिल गया', 'मुसाफिर' यांसारख्या चित्रपटात काम केले होते.
दिल्ली गणेश- Delhi Ganesh प्रसिद्ध टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेता दिल्ली गणेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी चेन्नई येथे ९ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांनी 'सिंदू भैरवी', 'नायकन', 'अपूर्व सौदरगरगल', 'अजब प्रेम की गज़ब कहानी', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हिंदुस्थानी २' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'वाह ताज'ची जाहीरात अन् केस न कापण्याची शर्थ...; झाकीर हुसैन यांच्या कुरळ्या केसांमागील आहे अशी रोचक कथा