गणेशोत्सवात 'या' कार्सवर जबरदस्त सवलत. (फोटो सौजन्य- सोशल मीडीया)
Jeep Grand Cherokee सप्टेंबर 2024 महिन्यासाठी, जीप ग्रँड चेरोकी कारवर तब्बल 12 लाख रुपयांची रोख सवलत मिळत आहे.
MG Gloster SUV वर या महिन्यात विद्यमान मॉडेलसाठी 6 लाख रुपयांची मोठी सूट मिळते. ऑफरमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सवलत तसेच एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे.
महिंद्रा कंपनीकडून त्यांची एकमेव इलेक्ट्रिक कार, Mahindra XUV400 वर भरीव सूट देखील देत आहे.XUV400 चे दोन्ही प्रकार 3 लाख रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध केले गेले आहेत.
Volkswagen Taigun MY23 वर 3.07 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे.
टोयोटा कंपनीने त्यांच्या हिलक्स पिक अप मॉडेलवर 14 लाख रुपयांपर्यंत कमाल सूट ऑफर केली आहे. त्यामुळे ज्यांना पिक मॉडेल खरेदी करायचे आहे त्यांच्याकरिता ही कार उत्तम पर्याय असणार आहे.