Manoj Jarange Patil is aggressive on Bhagwan Baba Gad Mahant support Dhananjay Munde side
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले होते. त्यांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. भगवानबाबागडचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घातले आहे. यावरुन जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून बीड हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आले आहेत. यामध्ये भगवानबाबागडाच्या महंतांनी देखील धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच गुंड थोडेच संप्रादाय चालवतात ? गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं वाटत नाही, अशा कडक शब्दांत मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. ते एक मोठे महंत आहेत. राजकीय लोक डागळेलेले असतात. मात्र मला वाटत नाही ते बोलले असतील. त्यांना दोष देऊन जमणार नाही. जाणारे त्यांना शिकवत असतील की, असे बोला तसे बोला.त्यांना दोष देण्यापेक्षा जो गेला,तो जे करतो तो काही ऐकायला तयार नाही. विकृतपणाने केलेले कार्य याला समाज पाठीशी घालत नाही.समाजात प्रचंड उद्रेकाची लाट तयार झाली तर समाज पाठीशी घालणार नाही,” अशी कडक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, “गुंड थोडेच संप्रादाय चालवतात ? गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं वाटत नाही.हे शिकवले असा संशय येतो. महाराज वेगळे आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर दुरुस्त करतील. एक बाजू सांगितली तर पटत असते. फास लागायला लागला तर आसे होऊ शकते. मला वाटत नाही त्यांच्यावर दबाव असेल, जे आहे ते रोखठोक आहे. जे आहे ते सडेतोड आहे. देशमुख यांची घटना मोठी त्याला गड पाठीशी घालू शकत नाही. गफलत असेल, राज्याचे मोठे दुर्दैव आहे,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, शेवटी महंत महंत आहेत. बाबाजी (नामदेव शास्त्री) कडू शब्द गेले असतील राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आनंद आहे का? खून केलेल्यांना सोडून द्या असा अर्थ होतो का ? काय शिकावे शिकवणार्याने, बाबाजी (नामदेव शास्त्री) ला दोष देऊन काय उपयोग ? तुम्ही माणूस मारून टाकला,माणसाच्या रक्ताची दया मया नाही का? पूर्वीचे दुख देणारे हेच का? हीच का ती टोळी? बाबा (नामदेव शास्त्री) यांना ही यात ओढतच आहे? धनंजय मुंडे कोणता सलोखा ठेवत आहेत? बाबाजी यांचा दोष नाही. न्यायची अपेक्षा न करणे फक्त गुंड सांभाळणे. त्यांची सर या गुंडाला नाही येणार, बलात्कार, खून असे करून स्वत:च्या जातीचे लोकांचे खून केले. पाप यांनी केलं मात्र बाबाजी यांना पांघरून टाकायला लावलं का? बाबाजी जवळ जावून पाप लपवू नये, असे अनेक गंभीर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.