NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. संगीता वाझे आणि ॲड. अंजली साळवे-विठणकर यांच्यावर महिला संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Sharad Pawar NCP News, NCP Sharadchandra Pawar Party, NCP Organizational Changes, Sangita Waze Appointment, Anjali Salve Vitankar,
शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी(Photo - X)
Published on: 
Updated on: 
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक बदल

  • संगीता वाझे यांची मुंबई महिला अध्यक्षपदी नियुक्ती

  • ॲड. अंजली साळवे-विठणकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी

NCP Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या संघटनात्मक घडामोडी घडल्या आहेत. पक्षाच्या महिला आघाडीमध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, दोन महिला नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला आता नवी दिशा मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या राज्य मुंबई महिला अध्यक्षपदी संगीता वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ॲड. अंजली साळवे-विठणकर यांच्याकडे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. यासंदर्भात पक्षाकडून अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.

Sharad Pawar NCP News, NCP Sharadchandra Pawar Party, NCP Organizational Changes, Sangita Waze Appointment, Anjali Salve Vitankar,
शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

महिला संघटना मजबूत करण्यावर भर

या नियुक्त्यांच्या माध्यमातून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महिला संघटना अधिक मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, महिलांना पक्षाशी जोडणे आणि पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.

शरदचंद्र पवार यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचं नेतृत्व उपयुक्त ठरेल, असा विश्वास पक्षाने नियुक्तीपत्रात व्यक्त केला आहे.

विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान संघटनात्मक बदलांची चर्चा

दरम्यान, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे पक्षांतर्गत घडामोडींकडेही लक्ष वेधलं जात आहे.

अशा वातावरणात शरद पवारांच्या पक्षाने महिला संघटनेत केलेल्या या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आगामी काळात नव्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक पातळीवर कोणते उपक्रम राबवले जातात आणि महिला आघाडीला किती बळ मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकंदरीत, राष्ट्रवादीतील राजकीय चर्चांसोबतच आता पक्षबांधणीच्या हालचालींनाही वेग आल्याचं या नियुक्त्यांमधून दिसत आहे.

Sharad Pawar NCP News, NCP Sharadchandra Pawar Party, NCP Organizational Changes, Sangita Waze Appointment, Anjali Salve Vitankar,
'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात