फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी अहोई अष्टमी तिथी साजरी केली जाते. या दिवशी महिला त्यांच्या मुलांसाठी दीर्घायुष्य, उज्ज्वल भविष्य आणि आनंदी जीवनासाठी निर्जल उपवास करतात. दरम्यान हा उपवास खूपच कठीण असल्याचे मानले जाते. कारण सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत अन्न किंवा पेय वर्ज्य करावे लागते. संध्याकाळी तारे पाहिल्यानंतर आणि त्यांची प्रार्थना केल्यानंतरच उपवास सोडला जातो. पंचांगानुसार, अहोई अष्टमीचे व्रत सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी हे व्रत पाळले जाणार आहे. त्या दिवशी अदल आणि परिघ योग तयार होणार आहे. अहोई अष्टमीच्या दिवशी अदल आणि परिघ योगापासून कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे, जाणून घ्या
पंचांगानुसार, सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून सकाळी 8.10 वाजेपर्यंत परिघ योग तयार होईल. यादरम्यान अदल योग देखील तयार होईल. सोमवारी, सकाळी 6.36 ते दुपारी 12.26 पर्यंत अदल योग राहील. ज्योतिषशास्त्रानुसार अदल आणि परिघ योग हे दोन्ही अशुभ योग तयार होतील. ज्यामुळे काही व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात.
अहोई अष्टमीला तयार होणारे या दोन योगाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. जर तुमच्या घरात काही सतत समस्या असतील तर वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त घरामधील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. येणाऱ्या काळात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन जमीन किंवा वाहने खरेदी करणे अशुभ ठरेल.
अदल आणि परिघ योगाचा अशुभ परिणाम सिंह राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होऊ शकतात. तुम्ही घाईघाईने निर्णय घेऊ शकता ज्याचा तुम्हाला लवकरच पश्चात्ताप होईल. वृद्ध लोकांना चांगल्या बातमीऐवजी वाईट बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरातील शांती आणि आनंद भंग होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वृषभ आणि सिंह राशीव्यतिरिक्त मीन राशीच्या लोकांना या योगाचा अशुभ परिणाम जाणवू शकतो. अहोई अष्टमीच्या दिवशी महिलांकडून मोठी चूक होऊ शकते, ज्यामुळे त्यांना काही दिवस त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. काम करणाऱ्या व्यक्तींना महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू शकते. या दिवसात वृद्धांचे आरोग्य देखील खराब राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)