Astrology: घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी 'असा' करा तुरटीचा वापर
वैज्ञानिक दृष्चीकोनातून तुरटीचे अनेक फायदे आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी पाण्यावर फिरवली जाते. त्याचप्रमाणे सर्दी ताप आणि खोकल्यासाठी देखील तुरटी गुणकारी आहे म्हणूनच तिला औषधी म्हटलं जातं. जसं तुटीला वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व आहे, त्याचप्रमाणे हिंदू धर्मिक कार्यात देखील तुरटीचं महत्त्व अनंन्यसाधारण आहे. लहान असाताना प्रत्येकाच्या आजीने मिठ, मोहरी आणि तुरटीने दृष्ट काढलेली असते.
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात सतत कौटुंबिक वाद आणि नकारात्मक वातावरण असेल तर तुरटीचा उपाय फायदेशीर ठरतो. गृह क्लेश, नातेसंबंध खराब असणं या समस्या राहूमुळे होतात असं म्हटलं जातं. राहूच्या प्रभावामुळे सतत आजारी पडणं, घरात धनसंपत्ती न टिकणं यांसारख्या समस्या त्रास देतात. अशावेळी तुरटीचा उपाय फायदेशीर ठरतो. राहूची सत्ता बाथरुममध्ये जास्त असते. म्हणूनच अंघोळ करताना पाण्यात तुरटी मिळल्याने राहूचा प्रभाव कमी होतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला घरामध्ये सतत नाकारात्मकता जाणवत असेल तर बाथरुमच्या खिडकीजवळ तुरटीचा खडा ठेवा.
व्यवयाय किंवा कामात वारंवार अपयश येत असेल कर घराच्या दारावर किंवा व्य़वयासायाच्या ठिकाणी एका कपड्यात तुरटी गुंडाळून ती बांधा. असं केल्याने नतारात्नकता हळूहळू दूर होईल.
हेही वाचा- मूलांक 7 असलेल्यांना धनप्राप्ती होण्याची शक्यता
नातेसंबंध मजबूत करण्यासाठी
राहूच्या नकारात्मक प्रभावामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. जर तुमच्य़ा घरात सतत वाद वितंड होत असतील तर रात्री झोपताना एका वाटीत पाणी घ्या. त्यात तुरटीचे काही तुकडे टाका. त्यानंतर ही वाटी बेडखाली ठेवून द्या. सकळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्या. असं केल्याने नातेसंबंध सुधारण्यास मदत होईलं असं वास्तूशास्त्र सांगतं.
हेही वाचा- कपाटाचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडणे शुभ असते? जाणून घ्या
नवग्रहांमध्या राहू सर्वात नकारात्मक मानला जातो. राहूच्या प्रभावामुळे कुटुंबात आणि व्यवसायात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान विष्णूंची उपासना करा. राहूला विष्णू देवांची भिती वाटते. रोज सकाळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी ‘ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः’या मंत्राचा जप केल्याने राहूचा प्रादुर्भाव कमी होतो.
टीप (ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)