
फोटो सौजन्य- pinterest
तुम्ही अनेक लोकांना ब्रेसलेट परिधान करताना पाहिले असाल, काही गोल, काही रुंद, काही डिझाइन केलेल्या ते फक्त फॅशन ॲक्सेसरीसारखे दिसत असले तरी त्याचा प्रत्यक्षात संबंध आपल्या ग्रहांशी आणि उर्जेशी संबंधित असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रेसलेट हे दिखाव्यासाठी परिधान केले जात नसून त्याचा एखाद्या व्यक्तीच्या नशीब, करिअर, आरोग्य आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. यासाठी खासकरुन लोखंडी ब्रेसलेट खूप प्रभावी मानले जाते, कारण त्याचा थेट शनिदेवाशी संबंध असल्याचे मानले जाते.
शनि हा न्यायाचा देवता आहे. ज्याला कर्मानुसार फळ देणारा असे देखील मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि दोष असतो अशा लोकांना लोखंडी ब्रेसलेट घालणे खूप फायदेशीर मानले जाते. परंतु हा फायदा फक्त योग्य दिवशी, योग्य पद्धतीने आणि उजव्या हातामध्ये घातल्यास फायदा होतो. बरेच लोक नकळत कोणत्याही धातूपासून बनवलेले ब्रेसलेट परिधान करतात त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. लोखंडी ब्रेसलेट कोणत्या राशीच्या लोकांनी परिधान करावे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक धातू एका ग्रहाशी संबंधित आहे. सोने सूर्याशी, चांदी चंद्राशी, तांब्याचा मंगळाशी आणि लोखंडाचा शनिशी संबंध आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिची स्थिती कमकुवत असेल किंवा शनिची साडेसाती किंवा धैया चालू असेल तर लोखंडी ब्रेसलेट घालणे खूप शुभ मानले जाते.
याशिवाय रत्नशास्त्रामध्ये ब्रेसलेट परिधान केल्याने नकारात्मक ग्रहांची ऊर्जा कमी होते आणि शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. पुरुषांनी ते नेहमी उजव्या हाताने घालावे, तर महिलांनी ते डाव्या हाताने घालू शकतात.
कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, परंतु बुध आणि शनि हे मित्र मानले जातात. म्हणून या राशीच्या लोकांनी शनिचा आशीर्वाद घेतला तर त्यांच्यासाठी लोखंडी ब्रेसलेट परिधान करणे खूप शुभ मानले जाते.
मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह स्वतः शनिदेव आहे. त्यामुळे या लोकांनी लोखंडाचे ब्रेसलेट परिधान करणे खूप शुभ मानले जाते. अशा लोकांना त्यांच्या कामामध्ये स्थिरता येते, नोकरीत बढती मिळते आणि व्यवसायात समृद्धी येते.
शनि हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे. लोखंडी ब्रेसलेट परिधान केल्याने या राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार दूर होतात आणि प्रयत्नांमध्ये यश मिळते.
लोखंडी ब्रेसलेट परिधान करण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वात शुभ दिवस मानला जातो कारण तो शनिदेवाचा दिवस आहे.
रोहिणी, पुष्य, अनुराधा किंवा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात ब्रेसलेट परिधान करणे सर्वोत्तम मानले जाते.
ब्रेसलेट परिधान करण्यापूर्वी ते गंगाजल किंवा गाईच्या दुधाने शुद्ध करणे आवश्यक आहे.
त्यानंतर ते परिधान करताना “ओम प्रम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नम:” या मंत्राचा 108 वेळा मंत्रांचा जप करावा.
पुरुषांनी ते उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात परिधान करावे.
दुसऱ्याने घातलेले ब्रेसलेट कधीही घालू नका; यामुळे त्याची प्रभाविता कमी होईल.
लोखंडी ब्रेसलेट परिधान केल्याने केवळ ग्रहांचा प्रभाव संतुलित होत नाही तर ऊर्जा देखील स्थिर होते. असे मानले जाते की ते एखाद्या व्यक्तीमधील चिंता, भीती आणि राग शांत करते. या ब्रेसलेटमुळे व्यक्तीमधील आत्मविश्वास वाढतो आणि वाईट काळात मानसिक स्थिरता राखण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)