फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह हा एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. या ग्रहाला सुख, समृद्धी, ज्ञान, शिक्षण, विवाह, मुले आणि अध्यात्म ग्रह म्हणून ओळखले जाते. गुरु ग्रह हा एका राशीमध्ये एक वर्षच राहतो नंतर तो आपले संक्रमण करतो. गुरुचे संक्रमण किंवा त्याच्या हालचालीचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. गुरु ग्रह बुधवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. गुरु ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होतो. कोणत्या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम होतील, जाणून घ्या
मेष राशीमध्ये गुरु ग्रह नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी असल्याने 9 जुलै रोजी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. ज्यावेळी तो तिसऱ्या घरामध्ये संक्रमण करेल त्यावेळी या लोकांना करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. या लोकांना परदेश प्रवास करण्याची इच्छा असल्यास संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह सातव्या आणि दहाव्या घराचा अधिपती ग्रह आहे. जेव्हा गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळी तो पहिल्या घरात असेल. यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तुमच्या कारकिर्दीमध्ये एक महत्त्वाचा बदल होऊ शकतो. तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतील. तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळू शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह पाचव्या आणि आठव्या ग्रहाचा स्वामी ग्रह आहे. जेव्हा गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तो अकराव्या घरामध्ये असेल. यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कारकिर्दीत तुम्हाला मोठे पद मिळू शकेल. व्यवसायात गुंतवणूक केलेल्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरू गुरु हा चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी असल्याने मिथुन राशीमध्ये जेव्हा तो संक्रमण करेल तेव्हा तो दहाव्या घरात असेल. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात बदल दिसू शकतात. या लोकांना व्यवसायामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होऊन प्रगतीच्या संधी निर्माण होतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी असल्याने तो मिथुन राशीमध्ये नवव्या घरात संक्रमण करेल. ज्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचा फायदा होईल. या लोकांचा समाजामध्ये मान सन्मान आणि आर्थिक स्थितीमध्ये देखील बदल होईल. आर्थिकदृष्ट्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह अकराव्या घराचा स्वामी आहे. मिथुन राशीच्या संक्रमणामुळे तो पाचव्या घराचा स्वामी असेल. यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. या लोकांना करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होताना दिसून येऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)